मुंबई :- भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना अवतार दिन अर्थात त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री चक्रधर स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार बाळासाहेब सानप, दिनकर अण्णा पाटील, भोपे समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी नांदगांवकर, मनोहर शास्त्री सुकेणकर, मुकुंदराज बाबा आंबेकर, अरूण भोजने, प्रकाश ननावरे, हिरामण महानुभव, आदी मान्यवरांनीही श्री चक्रधर स्वामींना अभिवादन केले. संस्थेच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मंत्रालय प्रांगणातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री चक्रधर स्वामीजींच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी अन्य मान्यवर तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे आदींनीही अभिवादन केले.