मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची सुरुवात

मुंबई :- तरूणांना परदेशातील रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास प्रबोधिनीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने विद्या विहार येथे प्रथमच सुरु झालेल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित होते.

जपान, जर्मनी, इस्राईल आणि फ्रांस या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या प्रबोधिनीच्या माध्यमातून होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच जर्मनी सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला असून, ज्याद्वारे ५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पण इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन, बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषा कौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनीमध्ये जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या ४ भाषांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच परदेशात जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठी, स्वयं-रोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून AI सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टप्ससाठी इनक्यूबेशन सेंटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फुर्ती देण्याचे काम करेल - डॅा.नीलम गोऱ्हे

Thu Mar 7 , 2024
Ø धामनगाव देव येथे गारमेंट क्लस्टरचे उद्घाटन Ø 500 महिलांना मिळणार हक्काचा रोजगारhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 Ø महिलांसाठी राज्यातील पहिलेच क्लस्टरhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 यवतमाळ :- महिलांना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतू पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामनगाव देव येथे केवळ महिलांसाठी सुरु करण्यात आलेले गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फुर्ती देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com