नागपूर :- माहे ऑगस्ट २०१९ ते माहे फेब्रुवारी २०२४ दरम्यान, पोलीस ठाणे सदर हदीत राहणाऱ्या २३ वर्षीय महिला फिर्यादी ह्यांचा परीचीत आरोपी नामे शैलेंद्र शिवलाल मडावी, वय ३१ वर्षे, रा. सदर, नागपुर याचेसोबत प्रेम संबंध होते. आरोपीने ओळखीचा फायदा घेवुन फिर्यादीस त्याचे घरी बोलावुन व लम्नाचे आमिष देवुन त्यांचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरसुध्दा आरोपीने अनेकवेळा फिर्यादीस वेगवेगळ्या ठिकाणी नेवुन त्यांचे इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीने आरोपीस लग्नाकरीता म्हटले असता, आरोपीने वेगवेगळी कारणे देवून लग्नास नकार दिला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे सपोनि कोडापे यांनी आरोपीविरुध्द करुम ३७६ (२) (एन) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून व तात्काळ दखल घेवुन, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.