‘रामलल्ला’ प्राणप्रतिष्ठा ;कामठीत सजावट-रोषणाई

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- संपूर्ण जगाला व देशाला ज्या आनंद व मंगलमय क्षणाची आतुरता होती.अश्या प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.या सोहळ्या निमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त कामठी शहरातील चौका चौकात सजावट व रोषणाई करण्यात येत आहे तर मंदिरामध्ये देखील साफसफाई व सजावट करण्यात येत आहे.

पाचशे वर्षानंतर अयोध्या येथे रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत असून कामठी शहरात याचा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत आहे. कामठी शहरातील राम मंदिरासह विविध मंदिरात भजन, आरत्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.तसेच विविध मंदिरामध्ये साफसफाई अभियान राबवित विविध संस्थांतर्फे सजावट, विद्दूत रोषणाई तसेच रांगोळ्या देखील काढण्याचे नियोजन रामभक्तातर्फे करण्यात आले आहे.तर 21 जानेवरीला बाईक रॅली तर 22 जानेवारीला भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मकरधोकडा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर

Fri Jan 19 , 2024
– 657 नागरिकांना चष्म्यांचे वाटप – खा. कृपाल तुमाने शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे आयोजन नागपूर :- उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे भव्य शिबिराचे करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत चष्मेही वाटप करण्यात आले. खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com