नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.10) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. 17, कॉटन मार्केट येथील जय दुर्गा ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे सतरंजीपूरा झोन अंतर्गत जुना कामठी रोड, बापुजी अणे नगर येथील M/s Ganesh Wood and Kharadi works यांच्याविरुध्द लाकुड आणि लाकुड कचरा फुटपाथ/रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत जरिपटका बस स्टॉप येथील श्री माही इलेक्ट्रो इन्फ्रा प्रा.लि. यांच्याविरुध्द बिनापरवानगीने फुटपाथ/सिमेंट रस्ता तोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com