नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.10) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. 17, कॉटन मार्केट येथील जय दुर्गा ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे सतरंजीपूरा झोन अंतर्गत जुना कामठी रोड, बापुजी अणे नगर येथील M/s Ganesh Wood and Kharadi works यांच्याविरुध्द लाकुड आणि लाकुड कचरा फुटपाथ/रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत जरिपटका बस स्टॉप येथील श्री माही इलेक्ट्रो इन्फ्रा प्रा.लि. यांच्याविरुध्द बिनापरवानगीने फुटपाथ/सिमेंट रस्ता तोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Next Post
उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळा संपन्न, मनपा व जिल्हा आरोग्य विभागाचा पुढाकार
Sat Mar 11 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.१०) उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात वैद्यकीय अधिकारी, झोनल वैद्यकीय अधिका-यांची कार्यशाळा घेण्यात आली. महाल येथील राजे रघुजी भोसले नगरभवन (टाउन हॉल) येथे झालेल्या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. रवींद्र सावरकर, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, […]

You May Like
-
July 6, 2023
मोटर सायकल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड
-
January 11, 2023
खासदार क्रीडा महोत्सव 2023 कबड्डी (विदर्भस्तरीय) निकाल
-
April 19, 2023
Fire Safety Week – Mock Drill at DPS MIHAN
-
March 13, 2023
पक्षियों की संख्या में 70% की कमी