कळमना मार्केट येथे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी

– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा

नागपूर :- नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे दक्ष आहे. कळमना मार्केट मधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला.

अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. 500 बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे 10 टेबल 10 अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.

ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी 120 टेबल व रामटेकसाठी 120 टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे.

दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिट अँड रन च्या केस मध्ये त्या कारचालकाला अटक करा - बसपाची मागणी

Mon May 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – (पाच वर्षीय बालिका मृत्यू प्रकरण) कामठी :- कामठी निवासी राजेश भीमराव डहाट हे आपली पत्नी भाग्यश्री, मुलगा द्रोवील (10) व मुलगी आलिशा (5) यांना मोटर सायकलने कामठी कन्हान महामार्गाने देवलापार कडे होळीच्या दिवशी 25 मार्च 24 रोजी सायंकाळी जात असताना काळ्या रंगाच्या कारणे त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची पाच वर्षाची आलिशा नावाची मुलगी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com