सावनेर :- वर्षभर विशेषकरून पावसाळ्यात मोकाट गायी, सांड, कुत्रे इत्यादी शहरातील रस्त्यांवर कधी ठाण मांडून बसतात तर कधी यांचा मुक्त वावर असतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बहुतेक वेळा या जनावरांना थेट धडक बसते किंवा बावरलेले जनावर हल्ला करतात, त्यांच्या शेणावरून घसरणे वगैरे यात अपघात होऊन आतापर्यंत अनेक नागरिक, विद्यार्थी जखमी झालेले आहेत. जनावरे सुद्धा जखमी होतात. खासकरून नागमंदिर ते शिवमंदिर दरम्यान रहदारीचा कोंडमारा होतो. अनेक लोकांच्या या बाबतीत तक्रारी आहेत. या सर्व बाबींचा विचार करून स्थानिक लायन्स क्लब तर्फे प्रा. विलास डोईफोडे यांचे नेतृत्वात डॉ. शिवम पुण्यानी, ऍड. अभिषेक मुलमुले, रुकेश मुसळे, हितेश ठक्कर, ऍड. मनोजकुमार खंगारे, प्रवीण टोणपे आणि वत्सल बांगरे यांनी किरण बगडे मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर याची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली आणि निवेदन सुद्धा दिले. या समस्येवर उपाय योजना सुरुच असून अधिक गंभीरतेने लक्ष देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. जनावर मालकांनी सुद्धा आपली जनावरे मोकाट न सोडता सहकार्य करावे आणि नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा चर्चेतून सुर निघाला.
मोकाट जनावरांच्या उपाययोजनेसाठी निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com