पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठ संघाची घोषणा

अमरावती : – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे दि. 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर, 2022 दरम्यान संपन्न होत असलेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती याठिकाणी होणार आहे.

चमूमध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगांवची  मयुरी चौधरी व वंशिका किन्नाके, डी.सी.पी.ई., अमरावतीची निशा राणी, प्रियंका करमकर व सगुन दुबे, कला व विज्ञान महाविद्यालय, कु­हाची रोहिणी गायगोले व  अनी गायगोले, एस.पी.एम. विज्ञान आणि गिलानी कला महाविद्यालय, घाटंजीची पुर्वा महाजन व कोमल रोंघे, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीची दिव्या बोबडे, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची श्रुतिका नुतिवार व जिया कोटक, अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळची समिक्षा दिवेकर, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची चल्लवी पाटील, श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाची ऋशाली पोटदुखे हिची निवड करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात नि:शुल्क हिमोग्लोबीन तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न

Thu Oct 20 , 2022
आरोग्य केंद्राचे आयोजन अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्राच्यावतीने विद्यार्थींकरीता नि:शुल्क हिमोग्लोबीन तपासणी शिबिर व औषध वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्रमुख अतिथी म्हणून मुलींच्या वसतीगृहाच्या वार्डन डॉ. मनिषा कोडापे, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात, लोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते. शिबिरात 175 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. 155 विद्यार्थीनींची हिमोग्लोबीनची तपासणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com