मुलांच्या गटात कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनी प्रथम
मुलींच्या गटात पुणे व अमरावती प्रथम
नागपूर : राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमाक कोल्हापूर व द्वितीय क्रमांक पुणे तर तृतीय क्रमांक लातूर संघाने पटकाविला. 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक क्रीडा प्रबोधिनी व द्वितीय क्रमांक नागपूर तर तृतीय क्रमांक नाशिक संघाने पटकाविला.
17 वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे व द्वितीय क्रमांक कोल्हापूर तर तृतीय क्रमांक नागपूर संघाने पटकाविला. 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक अमरावती व द्वितीय पुणे तर तृतीय क्रमांक औरंगाबाद संघाने पटकाविला.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा हॅन्डबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व 19 वर्ष वयोगटातील मुलांमुलीचे राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे करण्यात आले.
या राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेचा समारोप नुकताच करण्यात आला. महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी असे एकुण 9 विभागातील खेळाडू, पंच, संघव्यवस्थापक मार्गदर्शक सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा हॅन्डबॉल संघटनेचे डॉ. सुनिल भोतमांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप व बक्षीस वितरण संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते विजयी झालेल्या संघांना प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्याकरीता क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, हॅन्डबॉल संघटना, पंच, शासकीय वैद्यकीय पथक व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.