समर्थ शाळेमध्ये कला, क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव

– २० ते २४ जानेवारीदरम्यान होते आयोजन

– विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह

रामटेक :- शहरातील श्री समर्थ शिक्षण मंडळ द्वारा संचलित समर्थ विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयात कला, क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचा कार्यक्रम नुकताच २० ते २४ जानेवारी दरम्यान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या व त्यात शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थीनींनी आवर्जुन व उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमा शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक २४ जानेवारी मंगळवार रोजी श्री समर्थ शिक्षण मंडळ द्वारा संचालित समर्थ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किमंतकर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, क्रिडा स्पर्धा तथा डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यर्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सदर स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी उपस्थीतांमध्ये समर्थ शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा कुसुम किमंतकर सचिव ऋषिकेश किमंतकर,  विशाल बरबटे , दामोदर धोपटे ,सारंग किमंतकर (सदस्य,श्री समर्थ शिक्षण मंडळ रामटेक), एस.एस.लांजेवार (मुख्याध्यापक/प्राचार्य, समर्थ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक), ममता लोखंडे (उपमुख्याध्यापिका, समर्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,रामटेक) तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, समस्त पालकगण व विद्यार्थी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com