50 हजाराच्या लाभासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार आधार प्रमाणिकरण..

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 6,240 लाभार्थ्यांची यादी जाहीर

नागपूर : शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यास प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षातील घेतलेल्या पीक कर्जापैकी किमान दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50 हजार रूपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत बँक व खासगी बँकांनी पीक कर्ज खात्यात शेतकऱ्यांनी नियमितपणे भरणा केलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे.

या योजनेत पात्र असलेल्या विशिष्ट क्रमांकासहची नागपूर जिल्ह्यातील 6240 लाभार्थ्यांची पहिली यादी 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. पुढील टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. शेतकऱ्यांच्या माहितीकरीता ह्या याद्या संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, पंचायत समिती, चावडी, ग्रामपंचायत व संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द करण्यात आल्या आहे.

विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार सुविधा केंद्र, सी.एस.सी.केंद्र येथे आधारकार्ड सोबत स्वत: जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेमधून कर्जाची उचल केली आहे, त्यांनी तितक्या वेळेस आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर प्रोत्साहनपर रकमेचा लाभाची रकम संबंधित शेतकऱ्याच्या बँकेच्या बचत खात्यात जमा होणार आहे.

आधार प्रमाणीकरण करतेवेळी आधार क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकली असल्यास त्याबाबत संबंधित पोर्टलवर तक्रार नोंदवायची आहे. सदर तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रकम जमा करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आदेश असल्याने, ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपले सरकार सुविधा केंद्र, सी.एस.सी.केंद्र येथे आधारकार्ड सोबत स्वत: जाउन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूरचे गौतम वालदे यांनी केले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'भारत में खनन की सुगमता' सुनिश्चित करे सरकार - डॉ. दीपेन अग्रवाल

Sun Oct 16 , 2022
खनन नीति को और उदार बनाया जाएगा – प्रह्लाद जोशी नागपूर – चैंबर ऑफ एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री एंड ट्रेड (कैमिट) के अध्यक्ष और भारतीय उद्योग व्यापार मंडल (बी.यू.वी.एम.) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ दीपेन अग्रवाल ने नागपुर की अपनी यात्रा के दौरान कोयला और खान और संसदीय मामलों के मंत्री प्रल्हाद जोशी से मुलाकात की और खनन संबंधित विभिन्न मुद्दों, विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com