गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, पाच जणांना अटक..

– गांजा तस्करी करणारे अंतरराज्यीय आरोपी 43 किलो गांजासह गजाआड..

नागपूर – गांजा तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखाच्या नागपुर ग्रामिण पथकाने पाच जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपींकडून 4,32,000/- रुपयांचा 43.200 कि.ग्रॅ. अंमली पदार्थ गांजा जप्त (Seized) केला आहे.
प्राप्त माहिती नुसार  दि. 24/10/2022 रोजी पेट्रोलींग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथकास गोपनिय माहीती प्राप्त झाली की अवैधरित्या गुंगीकारक वनस्पती अंमली पदार्थ गांजा भरून असलेली ग्रे रंगाची मारूती स्विफ्ट कार क्र. TS-15-FC-9175  हैदराबाद कडुन नागपुर चे दिशेने येत आहे. अशा माहीती वरून सदरचे पथकाने पोलीस ठाणे बुटीबोरी परिसरात सापळा रचुन खालसा ढाबा येथे सदर कार थांबवुन कारची झडती घेतली असता कारचे डिक्की मध्ये एकुण 43.200 कि.गॅ्र. गुंगीकारक वनस्पती गांजा मिळुन आल्याने कार मधील एकुण पाच आरोपी 1) प्रशांत  सुनिल मडोरी, वय 23 वर्ष, रा. पारडपल्ली थाना पिटलमकुपा ता. बासोडा, जि. कामारेड्डी, 2) राजु रामलु झिनका, वय 21 वर्ष, रा. कल्लेर, ता. नारायणकेड जि. संघरेड्डी, 3) एकनाथ सुनिल मडोरी, वय 25 वर्ष, रा. पारडपल्ली थाना पिटलमकुपा ता. बासोडा, जि. कामारेड्डी, 4) नविन काशीराम कत्तीगामा, वय 26 वर्ष, रा. पारडपल्ली थाना पिटलमकुपा ता. बासोडा, जि. कामारेड्डी, 5) गणेश  किशन केतावार, वय 25 वर्ष, रा. पारडपल्ली थाना पिटलमकुपा ता. बासोडा, जि. कामारेड्डी यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 43.200 कि.ग्रॅ. अंमली पदार्थ गांजा किं. 4,32,000/-रू, पाच मोबाईल संच किं. 46,000/-रू व स्विफ्ट कार किं. 7,00,000/-रू असा एकुण 11,78,000/-रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपींना जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे बुटीबोरी यांचे ताब्यात देवुन आरोपीं विरूध्द पोलीस ठाणे बुटीबोरी येथे अप.क्र. 649/22 कलम 20,22,29 NDPS Act अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक  राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोलीस सपोनि अनिल राउत, हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर  राउत, मदन आसतकर, नापोशि मयुर ढेकळे, सत्यशील कोठारे, अमृत किनगे, प्रणय बनाफर, विपीन गायधने, अजिज शेख, चापोना मुकेश शुक्ला तसेच सायबर सेलचे सतिश राठोड यांचे पथकाने केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com