जेलच्या मागील भागात शिळे अन्न , कॅटरर्सला १० हजारांचा दंड

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने जेलच्या मागील भागात उघड्यावर शिळे अन्न फेकुन कचरा केल्याने संबंधीत कॅटरर्स कडुन १० हजार रुपयांचा दंड तर सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या नागरिकांकडून २ हजार रुपये दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.

यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज निश्चितच वाटते. स्वच्छता ही स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकीच आपलीही जबाबदारी आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहेत. दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे. स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शीतकाल सत्र के पहले दिन नागपुर में डब्बल मर्डर से उपराजधानी दहली,हत्या कर शव को डिवाइडर पर रखा..

Mon Dec 19 , 2022
सौरभ पाटील, संवाददाता  वाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र के वडधामना में हुई घटना। वाडी – सोमवार को सुबह सुबह उपराजधानी में डब्बल मर्डर की वारदात से उपराजधानी दहली. नागपुर में शीत सत्र की शुरुवात हुई । राज्य का पुरे मंत्रिमंडल और पूरा पुलिस दल बाल भी नागपुर में होने के बावजूद डब्बल मर्डर की वारदात से उपराजधानी में सनसनी फैली। प्राप्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com