नागपूर :- संपूर्ण देशभरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येते. या निमित्त संविधान चौकात सायंकाळी संविधान सन्मान संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत संध्येला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सर्वसामान्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही संगीत संध्या आयोजित करण्यात आली होती. संविधानातील कलमांमधून दिलेले अधिकार संगीताच्या माध्यमातून प्रख्यात लोकसंगीत गायक आनंद शिंदे आणि त्यांच्या चमूने सादर केले. यावेळी आमदार प्रवीण दटके, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उपसंचालक संदीप शेंडे, माजी आमदार मिलिंद माने उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.