संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यक्रमातील सिकलसेल सप्ताह कार्यक्रम अंतर्गत आनंद नगरातील समाज भवनात सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारला करण्यात आले
माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कामठी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानूनी, आशा गट प्रवर्तक रश्मि वानखेड़े, प्रयोग शाळा तंत्र प्रियंका भोयरकर, अलीफा अंजुम उपस्थित होते.
शिबिरात 35 लहान बालकांची तर 25 नागरिकाची तपासणी करण्यात आली
शिबिरा च्या यशस्वीते साठी आशा स्वयं सेविका सुकेशिनी गजभिये, सपना भिमटे,अंगणवाड़ी सेविका तारा जगणे,कुंदा पिल्लेवान आणि अविष्कार केंद्र च्या शिक्षिका जया मेश्राम, विद्या बोंबले तसेच कार्तिक चव्हान, हितेश तिरपुड़े, बादल कठाने, विक्की बोंबले,अरविंद चवडे, रोहित दहाट,बंडू पटले, कार्तिक चव्हान,यांनी सहकार्य केले.