‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श या‍ विषयी प्रशिक्षण कार्यक्रम

भंडारा :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग),जिल्हा महिला व बालविकास कार्यालय (राज्य स्तर ),याच्या संयुक्त विद्यमाने’ सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श ” व ”सत्यनिष्ठा ‘ याविषयांवर महिला शिक्षकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम काल नियोजन भवन सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

राजेश गो. अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग), जिल्हा महिला व बालविकास कार्यालय ( राज्य स्तर ), यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्टेबर 2023 रोजी सकाळी 10.ते सायं. 5.30 वाजे पर्यंत जिल्हा नियोजन भवन, येथील सभागृह कक्षात ‘ सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श ” व ” सत्यनिष्ठा ‘ यावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक  राजेश गो. अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांनी अध्यक्षीय मार्गदर्शंनामध्ये पुरूष शिक्षकांपेक्षा महिला शिक्षक विद्यार्थ्यांना ‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श’ प्रभावीपणे समजावून सांगू शकतात म्हणून महिला शिक्षकांना सदर प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले.

तसेच बालकांना सतर्क व जागरूक करून त्यांच्या विरोधात होणा-या अन्यायाला रोखण्यासाठी बोलके करू शकतात असे सांगितले. बालकांवर अन्याय होउ नये म्हणून न्याय विभाग व जिल्हा प्रशासन सजग असून शिक्षकांना एखाद्या बालकांवर लैंगिक तसेच ईतर अत्याचार होत असल्याचे आढळल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले.

योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, यांनी बालकांवर लैंगिक अत्याचार होउ नये म्हणून शिक्षकांनी सजग राहून बालकांना ‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श’ याबद्दल मार्गदर्शन करावे असे सांगितले. लोहीत मतानी, पोलीस अधिक्षक, यांनी बालकांवर अत्याचार होत असल्याचा आढळल्यास जवळील पोलीस ठाण्यामध्ये ताबडतोब तक्रार दाखल करावे असे महिला शिक्षकांना आवाहन केले.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमात कमलाकर रणदिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तसेच  तुषार पौनीकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय डोरलीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), व आभार  बिजु बा. गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांनी केले. तसेच संचालन असम्तिा गलफडे, शिक्षीका, लाल बहादूर शास्त्री विद्यालय,यांनी केले.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. वर्णाली घोष,चिफ फॅसीलीटेटर, युवा रूरल असोशिएशन,यांनी दोन्ही सत्रांमध्ये ‘ सत्यनिष्ठा ‘ यावर उपस्थित शिक्षिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच प्रियंका सिन्हा, प्रशिक्षक, लिंगाधारित हिंसा, सार्थक प्रकल्प, प्लॅन इंडिया, मुंबई व सानिका वडनेरकर, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, यांनी ‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श’ यावर मार्गदर्शन केले. साठवणे, बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, यांनी चाईल्डलाईन याबद्दला मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हयातील महिला शिक्षिका तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग ),कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी बिजु बा. गवारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संजय डोरलीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), व तुषार पौनीकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, यांनी परिश्रम घेतले.

NewsToday24x7

Next Post

मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान आयोजन

Thu Sep 14 , 2023
भंडारा :- जिल्हा प्रशासन व तसेच सूचना व प्रसारण क्षेत्रीय कार्यालय,नागपूर यांच्यावतीने 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बस स्टॅण्ड परिसरात करण्यात येणार आहे. या आयेाजनाची पूर्वतयारी बैठक आज अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,कमलाकर रणदिवे ,यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मनिषा कुरसुंगे, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक ,संजय डोर्लीकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com