कन्हान :- अवजारांचे प्रणेते श्री भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची वर्कशॉप मध्ये प्रतिष्ठापना शनिवारी सकाळी करण्यात आली. विद्युत रोषणाई सह आकर्षक सजावट यावेळी करण्यात आली होती. रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गुलालाची उधळण करीत श्री भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. जवाहरलाल नेहरू इस्पितळ, कांद्री, कन्हान च्या मुख्यमार्गावरून फिरत कन्हान नदीवर सायंकाळी भगवान विश्वकर्मा मुर्ती ची पुजा अर्चा करून मूर्ती विसर्जन करण्यात आली. यावेळी रवींद्र पाटील, सुरेश धकाते, जितेंद्र प्रसाद, राजेश बोरीकर,प्रशांत हटवार, राजेश भुते, उमा शंकर रायपूरकर, शुभम तुळणकर, नरेश साखरकर, अरुण कावळे, देवाजी घुगल, दामोदर बंड, नरेंद्र वाघमारे, राकेश वानखेडे, अनिल प्रसाद, शरद दुधे, श्याम बावनकुळे,यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते
वेस्टर्न कोलफिलड लिमिटेड च्या एकीकृत इंदर कामठी ओपन कास्ट विद्युत व यांत्रिक विभागात श्री भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com