नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत प्लॉट नं. १२२०, बुध्द नगर, ऐश्वर्या बंगला, नागपुर येथे राहणाण्या फिर्यादी नामे प्रतिभा चंद्रशेखर नितनवरे, वय ५६ वर्षे यांना आरोपी क. १) निशांत चंद्रमणी मानवटकर, वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. ८७, कपोलनगर, नागपूर २) भंत शिवनी बोधानंद थेरो, वय ४७ वर्षे, रा. बुध्दभुमी महाविहार, कामठी रोड, खैरी, नागपुर यांनी संगणमत करून फिर्यादी सोबत ओळखीचा फायदा घेवुन दिनांक ०८.०३.२०२४ चे १३.०० वा. ते दि. ०१.०६.२०२४ रोजी दरम्यान वेगवेगळे कारणे सांगुन फिर्यादीकडून रोख स्वरूपात तसेच चेक द्वारे १०,५०,०००/-रू. उधारीने घेतले, फिर्यादी यांनी विश्वास ठेवुन आरोपी यांना रक्कम दिली. आरोपी यांनी नमुद रकमेचा वापर त्यांचे महाबोधी टुरीझम करीता करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. फिर्यादी यांनी आरोपींना रक्कम परत मागीतली असता, आरोपींनी फिर्यादीला महाबोधी टुरीझम मध्ये भागीदारी देवुन होणाऱ्या फायद्यातुन फिर्यादीकडून घेतलेली रक्कम परत देण्याचे सांगीतले, परंतु आरोपींनी फिर्यादीस कोणतीही रक्कम परत न करता फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून, फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे आरोपींविरुध्द कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपी क. १ व २ यांना अटक करण्यात आलेली होती. दोन्ही आरोपी सद्या मा. न्यायालयातुन जामीनावर आहेत. गुन्ह्याचे तपासात वातील आरोपींनी नागपुर शहरात किंवा इतरही ठिकाणी अशाचप्रकारे विश्वासात घेवुन नागरीकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न होत आहे. जनतेस आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारे कोणत्याही नागरीकाची आर्थिक फसवणुक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाणे पाचपावली येथे संपर्क क. ०७१२-२६३०६१८, मोबाईल क. ७०२०७५३९०९ तसेच, ९६७३३८४६६० यावर संपर्क साधावा.