अंभोऱ्यातील जलपर्यटनातून भूमिपुत्रांना रोजगार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मांढळ गावात महायुतीच्या सभेत विजयाची हुंकार

 राजू पारवेंचा ‘धनुष्य बाण’ला दिल्लीला पाठवा

 जनसंवाद रथ यात्रा पोहचली रामटेक विधानसभा क्षेत्रात

काही :- जगभरातील पर्यटक वाघांना पाहण्यासाठी रामटेकमध्ये येतात. जे वाघ पाहण्यासाठी येतात तेच अंभोऱ्यात जलपर्यटनाचा आनंद घेऊ शकतील. यासाठी अंभोऱ्यात जलपयर्टन प्रकल्प तयार करण्याचा मानस आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अभोऱ्यांत पर्यावरण पूरक विकास आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यासाठी राजू पारवे यांना दिल्लीत पोहचवायचे आहे, असेही ते म्हणाले.

कुही तालुक्यातील मांढळ येथे शनिवारी महायुतीचे व शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या प्रचार सभेत अध्यक्षीय भाषण करीत होते. यावेळी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या तसेच विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे, माजी मंत्री डॉ. दिपक सावंत, महायुतीचे उमेदवार राजू पारवे, खासदार कृपाल तुमाने, भाजपचे जेष्ठ नेते माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अरविंद गजभिए, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवारसह उमरेडचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन रिपब्लिकन एकता मंच रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोसीखुर्द प्रकल्पाबद्दल बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 25 वर्षापासून गोसीखूर्द पूनर्वसनाचे प्रश्न नेहमीच महायुतीच्या सरकारने अग्रस्थानी घेतले आहे. पूनर्वसनात मिळालेल्या जमिनी 25 वर्षा अगोदर देण्यात आल्या. आता पूनवर्सनग्रस्तांचे कुंटुबातील सदस्यांची वाढ झाल्याने त्यांच्यावर विचार महायुती सरकार करीत आहे. या विषयावर राजू पारवे यांनी पाठपुरावा घेतला आहे. गोसीखूर्द वासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार लवकरच जुन्या फाईलींना उघडून नव्याने प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 महायुतीकडे मोदी नावाचे भक्कम इंजिन

लोकांचा विश्वास मोदिवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या 10 वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनते समोर आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक ही भारताला मजबूत करण्याची निवडणूक आहे. महायुतीच्या रेल्वे गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंजिन आहे ज्यात विकासाच्या बोग्या लागल्या आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक घरातील नागरिकाला देशाचे पुढील नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदी हेच हवे आहेत. 

 रिकॉर्ड मते धनुष्य बाणाला जाणार: निलम गोऱ्हे

15 वर्षांपूर्वी रामटेकला प्रचारासाठी मी जेव्हा आली होती तेव्हा हे क्षेत्र विकासापासून कोसो दूर होता. शिवसनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी दहा वर्षे विकासभिमूख केलेली कार्यातून आज चित्र बदलले आहे. मग ते रामटेक मंदिराच्या विकासाचे असो की पाण्याचे असो. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारने आज नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम केले आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्रात नरेंद्रमोदी सरकार आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारने केलेली कामे आज जनतेला सर्वश्रृत आहे. येत्या 4 जूनला जेव्हा निकाल उमरेड विधानसभा क्षेत्रातून रिकॉर्ड मते धनुष्य बाणाला जाणार असल्याचा विश्वासही शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या तसेच विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे व्यक्त केला.

 जनसंवाद रथ यात्रा पोहचली रामटेक विधानसभा क्षेत्रात

रामटेक विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मनसर, कान्द्री मनसर, पवनी, देवलापार, करवाही, वडंबा, बेलदा, हिवरा बाजार, मुसेवाडी, पंचाळा, शिवनी, भंडारबोडी, अरोली, चोखाळा, काचूरवाही, नगरधन, शीतलवाडी मार्गाने रामटेक नगर परिषद या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या जनसंवाद रथ यात्रेचा रामटेक शहरात रात्री झालेल्या भव्य प्रचार सभेनंतर समारोप झाले. याप्रसंगी महायुतीचे रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मलिकाअर्जुन रेड्डी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्ते तसेच नागरिकांचा सहभागाने जनसंवाद रथ यात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन

Sun Apr 14 , 2024
मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com