मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. मंगळवार, दि. 6 डिसेंबर 2022 रोजी सायं 7.30 वाजता हे व्याख्यान महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून प्रा. डॉ. पवार यांचे व्याख्यान प्रसारित होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध तसेच भारतीय राज्यघटना या विषयांवर दोन भागात हे व्याख्यान आहे. या माध्यमातून प्रा. डॉ. पवार यांनी विस्तृत माहिती दिली आहे.