सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन

मुंबई :- सन २०२३-२०२४ या वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १२९ व्या सत्राच्या प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानवन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा येथे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५०/- व दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १००/- शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. त्यास पोहता येणे आवश्यक आहे, किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण, मासेमारीचा किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक /आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधीत मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

आयोजित प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पुर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई ६१ येथे दिनांक २० डिसेंबर २०२२ पर्यंत सादर करावीत.

अधिक माहिती करिता प्रदीप जगताप, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो.नं. 8788551916 व जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक, मो. नं 7507988552 यांचेशी संपर्क साधावा.

@ फाईल फोटो

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com