संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली त्यांची महत्वाकांक्षी योजना ‘जलशिवार योजना’ही महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन सुरू करण्यात आले असून या योजनेत कामठी तालुक्यातील 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे.या योजनेमुळे गावे जमसमृद्ध होणार अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2 मध्ये कामठी तालुक्यातील 11 गावांची निवड करण्यात आली असून या गावाचा गावनिहाय कच्चा आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच ही गावे जमसमृद्ध होणार आहेत.निवड झालेल्या या 11 गावात दिघोरी(बु),कढोली,गारला,धारगाव,आवंढी,परसाड, आडका,भुगाव,निन्हाई,केसोरी,एकर्डी चा समावेश आहे.या गावांचा कच्चा आराखडा आणि शिवार फेरी पूर्ण करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निवड झालेल्या उपरोकर नमूद गावात नाला खोलीकरण,शेततळे नूतनीकरण, बंधारा,नदी ,नाला गाळ काढणे,बंधारा नूतनीकरण,कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती,आदी कामे करून गाव जलसमृद्ध करण्यात येणार आहेत.
@ फाईल फोटो