नागपूर :- मा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे बातमी वरून पोनि रविंन्द्र मानकर, सपोनी एम. एम. मोकाशे, पो. हवा. राजेश हावरे, पोना कपोल, पोलीस अंमलदार अंकुश, सतिश यांचे सह पाटणसावंगी टोलनाका येथे नाकाबंदी केली असता छिंदवाडा रोड कडून नागपूर जाणाऱ्या रोडवर एका इनोवा गाडी कमांक एम एच-४९/वी ८३७२ ही संशयीत रित्या येतांना दिसल्याने तिला थांबवून आरोपी प्रज्वल विलासगाव खोरे वय २४ वर्ष रा तुकडोजी पुतळा चौक रघुजी नगर नागपुर याला ताब्यात घेवून त्याला विचारपुस करून त्याचे गाडीची तपासणी केली असता, इनोवा गाडी मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधीत तंबाखु व पान मसाला असलेल्या एकूण ६६ बोरी आणी ५ बॉक्स एकूण वजन ५२१.७६ कि.ग्रॅ किमंती ६,०२,७५०/- रू चा सुगंधित तंबाखू व इनोव्हा गाडी कमांक एम एच-४९/वी ८३७२ किंमती ५,००,०००/-रू असा एकूण ११,०२,७५०/-रू. चा मुददेमाल, आरोपी हा त्याचे मित्रांचे सांगणेवरून सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतूक करतांना प्रत्यक्ष मिळून आल्याने, त्याचेवर पोस्टे सावनेर येथे अपराध कमांक ५९५/२४ कलम २७२, २७३, ३२८, १८८ भादवी सहकलम अन्न व मानके कायदा २००६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही, हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक, ना ग्रा, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक, ना प्रा अनिल मस्के सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोनी रविंन्द्र मानकर, सपोनी मंगला मोकाशे, पोहवा राजेश हावरे, पोना कपोल तभाने, पोशि अंकूश मूळे, सतिश देवकते यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनी मोकाशे हया करत आहे.