कामठी नगर परिषद हद्दीतील मतदार यादीत समाविष्ट असलेले ग्रामीण भागातील मतदारांचे नावे वगळा – कपिल गायधने

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी कामठी शहराच्या संबंधित प्रभागामध्ये विभागून व अधीप्रमाणित करून तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने 30 जानेवारीला दिले आहेत या अनुषंगाने कामठी शहराला लागून असलेल्या येरखेडा-रणाळा गावातील रहिवासी काही ग्रामस्थ मतदारांचे नावे कामठी नगर परिषदच्या मतदार यादीत सुद्धा समाविष्ट झाले आहेत या ग्रामीण भागातील मतदारांनी नुकतेच झालेल्या ग्रा प निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला तर आगामी कामठी नगर परिषद निवडणुकीत सुद्धा मतदानाचा हक्क बजावणार आहेत तेव्हा कामठी नगर परिषदच्या मतदार यादीत समाविष्ट असलेले ग्रामीण भागातील मतदारांचे नावे वगळा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नागपूर जिल्हा ग्रा महामंत्री व माजी नगरसेवक कपिल गायधने तसेच पंकज वर्मा यांनी विधानपरिषद सदस्य तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

नुकत्याच 18 डिसेंबरला संपन्न झालेल्या कामठी तालुक्यातील ग्रा प निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानुसार कामठी शहराला लागून असलेल्या येरखेडा -रणाळा ग्रा प निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेले काही मतदारांचे नावे ही कामठी नगर परिषदच्या मतदार यादीत सुद्धा समाविष्ट आहेत त्यानुसार प्रथमता कामठी नगर परिषद मतदार यादीतून ग्रामीण भागातील मतदार यादीत असलेले नावे वगळण्यात येणे गरजेचे आहे अन्यथा हेच मतदार आगामी नगर परिषद निवडणुकीत मतदार यादीत नावे असल्याचा हक्क गाजवत दुबार मतदान करतील वास्तविकता निवडणूक विभागाच्या चुकीमुळे मतदार ग्रामीण व शहरी या दोन्ही जागेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात हे योग्य नाही तेव्हा मौजा येरखेडा व रणाळा च्या मतदार यादीत शहराच्या मतदार यादीत असलेले नावे त्वरित वगळण्यात यावे अशी मागणी भाजप युवा मोर्चा तर्फे कपिल गायधने व पंकज वर्मा यांनी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sun Feb 12 , 2023
· मुख्यमंत्र्यांकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूतांवर आधारित विविध दालनाची पाहणी · या लोकोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवावा · श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने कणेरी मठावरील पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी · राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार कोल्हापूर : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com