चंद्रपूर मनपात संत गाडगे बाबा महाराज जयंती साजरी

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे व सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली.   याप्रसंगी बोलतांना सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी सांगीतले की,संत गाडगे बाबांना सामाजिक समरसता, स्वच्छता आणि समाजसुधारणा या गोष्टींमध्ये रस होता.दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. संत गाडगे बाबा यांनी त्यांचे सर्व जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले होते. संत गाडगे बाबा महाराज यांचे विचार हे नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरतात.

संत गाडगे बाबांना स्वच्छतेची विशेष आवड होती,आज मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत शहराची स्वच्छता करण्यात येते तेव्हा जयंती दिनानिमित्त निमित्त मनपा सफाई कर्मचारी,संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटना यांनी रॅली काढुन स्वच्छता विभागातर्फे अनोख्या पद्धतीने नमन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Thu Feb 23 , 2023
मुंबई : संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.            यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून गाडगेबाबा यांना अभिवादन केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com