चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

दुचाकी चालक मुशरिफ अंसारी गंभीर जख्मी असल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक किमी अंतरावर नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बैंक सामोर चार चाकी वाहन चालकाने दुचाकी वाहना ला समोरून जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जख्मीचा उपचार सुरू असुन कन्हान पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१४) जुन ला दुपारी १.३० वाजता दरम्यान मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांच्या भाचा मुशरिफ अंसारी हा आपल्या घरून दुचाकी वाहन क्र. एम ४० बी एम ०८३४ ने भाजीमंडी कामठी येथुन कन्हान ला जात असल्याचे आपल्या आई वडीलांना सांगुन निघाला होता. दुपारी २.३० वाजता दरम्यान कन्हान जबलपुर चारपदरी महामार्गावरील स्टेट बैंक सामोर एका ग्रे रंगाची कार वाहन क्र. एम एच ३१ एच ३६७८ इंडिका व्हिसटा च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन चुकीच्या दिशेने चालवित आणुन समोरून मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांच्या भासा मुशरिफ अंसारी च्या दुचाकी वाहना ला ज़ोरदार धडक मारल्याने मुशरिफ अंसारी हा गाडी सोबत खाली पडला आणि बहोश झाल्याने आजु बाजु च्या लोकांनी त्याला रोडच्या बाजुला नेले. त्याचा जव ळ असलेल्या फोन द्वारे घटनेची माहिती त्याचा घरच्या लोकांना दिल्याने मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांचे जावई व लहान भाऊ हे आपल्या कार ने घटना स्थळी पोहचले असता तेथील लोकांनी सांगितले की, चारचाकी कार च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन चुकीच्या दिशेने आणुन मुशरिफ अंसारी च्या दुचाकी वाहना ला जोरदार धडक मारली.या अपघाता त मुशरिफ अंसारी हा गंभीर जख्मी झाला असुन त्या च्या हाताला, डोळ्याचा खाली, पायाला, कोहणी ला, गुळग्याला मार लागल्याने त्यास प्रथम उपचाराकरिता वानखेडे हाॅस्पीटल येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन त्यास नागपुर च्या खाजगी रूग्णालयात रेफर केल्याने परिवारातील लोकांनी दुपारी ४ वाजता सिटी हाॅस्पीटल कामठी येथे उपचाराकरिता भर्ती केले असु न मुशरिफ अंसारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयु मध्ये ठेवले असुन सध्या बेहोशी च्या अवस्थेत उपचार सुरू आहे. सदर प्रकरणात कन्हान पोलीसांनी फिर्यादी मोहम्मद आदिल वल्द युसुफ खान यांच्या तोंडी तक्रारीने चारचाकी कार वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३३८ भादंवि १८४, १३४ (ए), १३४ (बी), ४, १२२, ११७ मो वा कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सागवन तस्करी करतांना तोतया पत्रकारासोबत चार आरोपीला अटक

Sun Jun 19 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – सागवन तस्करी करतांना तोतया पत्रकारासोबत चार आरोपीला देवरी वनविभागाने अटक केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी-चिचगड मार्गावर घडली असून आरोपी कडून तब्बल 5 लाख रूपयांचे सागवन जप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा आहेत. त्यातही सागवान वृक्षाचे फार मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसत असते. दरम्यान वन विभाग तस्करी थांबविन्यासाठी पेट्रोलिंग वर असताना रात्री तपासणी दरम्यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com