– सहा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये
नागपूर :- यशश्री चटटे रा. नागपुर याचे तकारीवरून आरोपी आकाश मनोहर पाटील रा मुंबई व इतर एक यांनी फिर्यादीचे पती मृतक समीर भास्कर चटटे यांचेशी मोबाईल व्दारे संपर्क करून एकुण २० कोटी व्यवसायिक कर्ज मंजुर करणे कामी प्रोसेसींग फी व कमीशन फी च्या नावाखाली वेळो वेळी आरटीजीएस, NEFT व्दारे एकुण २ कोटी रक्कम स्वीकारून दिलीप बिल्डकॉन कंपनी भोपालचे नावाने बनावटी चेक मोबाईल वर पाठवून कर्ज रक्कम २० कोटी मंजुर झाल्याचे भासवुन असे कोणतेही कर्ज मंजुर न करता २ कोटी रक्कम भूलथापा देवून फिर्यादी, फिर्यादीचे पती व फिर्यादीचे पतीचे मित्र यांची आर्थिक फसवणुक केली आहे यावरून पोलीस स्टेशन कोतवाली, नागपूर शहर येथे अप. के. ४२६ / २०२३ कलम ४२०, ४६५,४६७,४६८, ४७१,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ फिर्यादी व आरोपीतांचे बँक खात्यासंबंधाने माहीती प्राप्त करण्यात आली. तांत्रीक तपास व गुप्त माहितीव्दारे आरोपी कोठे आहे याची माहिती प्राप्त करून मा. पोउपआ आर्थिक गुन्हे शाखा नागपुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक मुंबई येथे पाठविले, तपास पथकाने आरोपी आकाश पाटील यास मालाड पश्चिम मुंबई परीसरातून स्थानिक पोलीसांचे मदतीने सापळा रचुन त्याला दि.२८/१०/२०२३ रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गुन्हयात वापरलेले एकूण २ मोबाईल फोन, अंदाजे किंमती ६०,०००/रु तसेच अपराहीत रकमेतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्ता बाबतचे दस्तऐवज, पिवळया धातूची दोन नग पायपटटी एकुन अंदाजे ५ ग्राम किमती २५,०००/रु व पासपोर्ट, असा एकूण ८५,००० रु वा मुददेमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीच्या बँक खात्यातील असलेली शिल्लक रक्कम १५,७०,०००/रु गोठविण्यात आली. आरोपी इसमा कडुन अधिक तपास करणे करीता ०६ दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मा न्यायालया कडुन प्राप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि अमोल देशमुख हे करत असून पोहवा नरेश पटेल, पोहवा चंद्रशेखर नागरे, पोहवा आशिष लक्षणे, नापोशि प्रीती धुर्वे या तपासपथकाने मुंबई येथे जावून तांत्रीक कौशल्याचा वापर करुन गुन्हयातील आरोपी आकाश पाटील यांना अटक केली आहे.