नागपूर – नागपूर शहर हद्तिील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चंदनाचे झाड कापुन चोरी होत असल्याची घटना निरंतर होत असल्याने चंदनाचे झाड कापुन चोरी झालेल्या गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02 मार्फत सुरू होता. मिळालेल्या गुप्तबातमीवरून गाव गोन्ही, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे एक इसम चंदनाचे लाकडाच्या गाभ्याची विक्री करीत आहे. सदर प्राप्त माहितीच्या आधारे छापा कार्यवाही करण्यात आली गुन्हयातील आरोपी क्रमांक 01) जयसिंग मोतीलाल संेगया वय 43 वर्शे रा. गोन्ही, तहसिल काटोल याचे ताब्यात चोरी झालेला चंदनाचा गाभा मिळुन आला. आरोपीची चौकशी केली असता त्याने चंदनाचे गाभ्याची विक्री आरोपी 2) शुभम अशोक कानकोजे उर्फ लोधी वय 22 वर्शे रा. मु. डोंगरगांव तहसिल काटोल जि. नागपूर. 3) आदर्श रामु राजपुत वय 26 वर्शे रा. डोंगरगांव पारधी बेडा, तहसिल काटोल जिल्हा नागपूर. 4) दोन विधीसंघर्शग्रस्त बालक यांनी केली असुन त्यानी जवळ जवळ 40 कि.ग्रा चंदनाचा गाभा, शमिम पठाण राहणार कन्नौज उ.प्र यास विक्री केल्याचे सांगीतले नमुद आरोपींना पो.स्टे. सदर येथील अप.क्र. 243/2022 कलम 379 भादविचे गुन्हात अटक केली असुन आरोपीचे ताब्यातुन चंदनाचा गाभा 03 किलो 300 ग्राम कि.अं. 15000/रु, दोन नग मोटार सायकल कि.अं. 1,00,000/रु.असा एकुणः-1,15,000/रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीं कडुन पो.स्टे. सदर येथील 3, पो.स्टे. सिताबर्डी योथिल 2 व पो.स्टे. अंबाझरी 1 असे एकुण चंदनाचे झाड चोरीचे 6 गुन्हे उघडकीस केलेले आहे.
सदरची कारवाई नागपुर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त आश्विती दोर्जे, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे नविनचंद्र रेड्डी, पोलीस उप आयुक्त (डिटेक्षन) चिन्मय पंडीत, सपोआ गन्हे शाखा रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि किशोर पर्वते, सपोनि पवार, तुशार काळेल, मपोउपनि लक्ष्मीछाया तांबुसकर, पोलीस हवालदार संतोश मदनकर, गणेश आगरेकर, रोनॉल्ड एंथोनी, रामनरेश यादव, आशिष ठाकरे, महेंद्र सडमाके, सुनिल कुवं र, सचिन आंधळे, सुरेश बर्वे , संतोश उईके, पोअं कमलेश गहलोद, मंगल जाधव यांनी केली.