स्व.भानुताई गडकरी संस्थेतर्फे परिवहन कार्यालयात आरोग्य तपासणी

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नेत्र व कर्ण तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अलीकडेच नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास ४०० नागरिकांची नेत्र व कर्ण तपासणीसह कर्करोग तपासणी, रक्त चाचणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. पोलीस कर्मचारी, चालक व इतर लोकांनी तपासणीमध्ये सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन  ऋतुजा गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेचे सदस्य डॉ. चंद्रशेखर मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर डॉ. गिरीश चरडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक अधिकारी सरक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक अहमद व स्नेहा मेंढे, सहायक मोटार वाहन निरीक्षक किशोर हिवराळे, राहुल धकाते, सिद्धार्थ टिपले, डॉ. अजय मुखर्जी, आशिष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, सरस्वती पॅथलॅब, न्यू इरा हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटलच्या टीमने शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवतार मेहर बाबा काम्प्लेक्स धरमपेठ में महाप्रसाद

Thu Jan 25 , 2024
नागपुर :- अयोध्या में श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के पावन पर्व पर धरमपेठ भोले पेट्रोलपंप स्थित अवतार मेहर बाबा काम्प्लेक्स में महाप्रसाद का आयोजन किया गया। कार्यक्रम के अध्यक्ष नागेश हरदास ने सर्वप्रथम प्रभू श्रीराम के फोटो पर माल्यार्पण कर अभिवादन किया। जय जय श्रीराम जयघोष के साथ हजारों भक्तों ने महाप्रसाद का लाभ लिया। सफलतार्थ संजय ठाकुर,अमोल राठौड़, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com