व्यापाऱ्याचे  पैसे लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

 स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण ची कार्यवाही
नरखेड –  तालुक्यातील टोळीपार गावातील कापूस खरेदी विक्री करणारे व्यापारी शुभम बेलखेडे हे महाराष्ट्रसह अन्य राज्यातून कापूस खरेदी करीत असतात. या कामाकरीता दिवानजी (मॅनेजर), ट्रक चालक व क्लिनर या कामावर त्यांचे मुळ गावातील व पांढुर्णा येथील काही मुलांना ठेवले होते. कापूस खरेदी करीता नेहमी दिवानजी सोबत मोठया प्रमाणात रोख रक्कम पाठवायचे हि बाब सर्व कामकारांना माहिती होती. दिनांक 21/03/2023 रोजी गडचिरोली येथील सिरोंचा गावातुन कापूस खरेदी करुन आनण्याकरीता दिवानजी  दशरथ कळंबे यांच्याकडे 21 लाख रुपये देवून टोळीपार गावातुन 2 आयशर ट्रक रवाना करण्यात आले. त्याचदिवशी रात्री 09.45 वाजताचे सुमारास काटोल हद्दीतील येनवा शिवारात त्यांचा ट्रक तिन अनोळखी इसमांनी थांबविला व दिवानजी आणि ट्रक ड्रायव्हर यांना मारहान करुन त्यांचेजवळील 21 लाख रुपयांची बॅग लुटून नेली. या घटनेमुळे पोलीस ठाणे काटोल येथे जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक  विशाल आनंद यांनी पोलीस ठाणे काटोल व स्थानिक गुन्हे शाखेचे विवीध पथके आरोपीच्या शोधात रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सतत आरोपीतांच्या शोधात होते व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला संशय होता की, पैशाबाबत माहिती असणाÚया व्यक्तीनेच ंिकवा बैलखेडे यांचे संबंधित व्यक्तीनेच सदर गुन्हा केला असावा असा दाट संशय होता व त्या दृष्टीनेच आरोपीचा तपास सुरू होता व ती गोष्ट खरी ठरली. आरोपीचे तपासात असतांनाच दि. 28/03/2023 रोजी माहिती मिळाली की, घटनेच्या रात्री पांढुर्णा येथील एक ड्रायव्हर जो बेलखेडे यांचे कापसाचे गाडीवर जात असतो तो नरखेड काटोल परीसरात मोटरसायकलने फिरत होता. अशी गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून त्यास ताब्यात घेवुन गुन्हया संबंधाने बारकाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचे सोबत असलेली मोटरसायकल व काळया रंगाची स्विफ्ट डिजायर गाडी जी त्यांनी गुन्हा करतांना वापरली. ती क्र.. MH-31-CS-6676 आणि मोटर सायकल क्र. MP-28-MS-9750 ताब्यात घेतली व आरोपी नामे- 1) रवि गणपती धुर्वे, वय 35 वर्ष रा. संत रविदास वार्ड, पांढुर्णा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) 2) सोनु उर्फ सुनिल रामचरन तेजी वय 33 वर्ष, रा. मेघनाथ वार्ड, लेंडी नदीचे काठी, पांढुर्णा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) 3) निखील मधुकर उईके, वय 24 वर्ष रा. संत रविदास वार्ड, पेवठा चौक, पांढुर्णा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश), 4) हिमांशु उर्फ मच्छी रामचंद्र बोंद्रे, वय 24 वर्ष, रा. मेघनाथ वार्ड, लेंडी नदीचे काठी, पांढुर्णा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) आणि 5) अमन रामदास धुर्वे, वय 27 वर्ष रा. शास्त्री वार्ड कबाडी मोहल्ला, पांढुर्णा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले.
वरील पाचही इसमांना ताब्यात घेतल्यानंतर येनवा शिवारातील लुटमारीच्या घटनेची चौकशी केली असता रवि गणपत धुर्वे याने व त्याचे साथीदारांनी मिळून येनवा शिवारात रस्त्यावर ट्रक अडवून जबरी चोरी केल्याचे सांगीतले. रवि धुर्वे याने माहिती दिली की, दि. 21/03/2023 रोजी टोळीपार गावातुन गडचिरोली येथे कापूस खरेदी करण्याकरीता बेलखोडे यांचे दिवानजी दशरथ कळंबे व ड्रायव्हर महेश हे दोघे मोठी रोख रक्कम घेवून जाणार असल्याची माहिती रवि धुर्वे याला होती. त्यामुळे ही रक्कम लुटपाट करण्याकरीता रवि व त्याचे इतर साथीदारांनी पांढुर्णा येथील सराईत अपराधी 1) चरणसिंग गब्बुसिंग भादा वय 24 वर्ष 2) करणसिंग जंगसिंग भादा वय 24 वर्ष आणि 3) बल्लूसिंग भादा सर्व रा. कबाडी मोहल्ला, पांढुर्णा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) यांना बोलावून घेतले व त्यांचे सोबत मिळून ट्रक मधील पैसे लुटण्याची योजना आखली. दि. 21/03/2023 रोजी येनवा शिवारात बेलखोडे यांचा
आयशर ट्रक थांबवून त्यामधील 21 लाख रुपये लुटले. आरोपीतांकडून 1,56,000/- रुपये काळया रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-31-CS-66766 आणि मोटर सायकल क्र. डच्28 डै9750 आणि एकुण 04 मोबाईल फोन असा एकुण 7,56,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्या नंतर आरोपींना पोलीस स्टेशन काटोल यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. फरार आरेापींचा शोध घेणे सुरू आहे.

सदर कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार,आशिषसिंग ठाकूर, सहा.फौजदार चंद्रशेखर घडेकर, पोलीस हवालदार दिनेशआधापूरे, निलेश बर्वे, ज्ञानेश्वर  राऊत, विनोद काळे, गजेन्द्र चौधरी, मिलींद नांदुरकर, इकबाल शेख, नरेन्द्र पटले, रोशन काळे, राजेंद्र रेवतकर, पोलीस नायक रोहन डाखोरे,, विपीन गायधने, अमृत किनगे, अजीज दुधकनोज, अभिशेक देशमुख, महिला पोलिस कान्स्टेबल स्वाती हिंडोरिया, सायबर सेलचे नायक सतिश राठोड, आणि चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, पोलीस शिपाई सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com