घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक, १४.०५.२०२३ चे १७.३० वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन पोलीस ठाणे गणेशपेठ मोक्षधामचे आत मंदीरा जवळ, गाड़ी क. एम. एच. ३४ बी. एन. १६५० वरील ईसमास पकडण्यास गेले असता तो पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. आरोपीचे कमरेतुन घातक शस्त्र, एक चाकू मिळून आला. आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने कपिल अशोक गवरे वय ३० वर्ष रा. प्रेम फरसान मागे, गौतम नगर, पोलीस ठाणे गिट्टीखदान असे सांगीतले. आरोपी हा कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देश्याने घातक शस्त्रासह मिळुन आल्याने त्याच्या विरुदध पोहवा विनोद देशमुख यांचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे कलम ४२५ भा..का सहकलम १३५ म.पो.क अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील कारवाईस्तव आरोपीला जप्त मुद्देमालासह गणेशपेठ पोलीसांचे ताब्यात दिले आहे. वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि शुभांगी देशमुख, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा, विनोद देशमुख प्रदिप पवार, पोनाओ अजय शुक्ला, हेमंत लोनारे व सोळके यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com