मोटरसायकल चोरी करणारी टोळी गजाआड ; २ मोटारसायकल सह ४ आरोपी ताब्यात !

नागपूर/सावनेर  –  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामिण हद्दीतील सावनेर उपविभागात पाहीजे व फरार आरोपी शोध करीत असतांना दि. 28/03/2023 रोजी रात्रीच्या दरम्यान नागपूर ते पांढुर्णा हायवे रोडच्या पुलाखाली 04 इसम संशयित मोटरसायकलसह मिळुन आल्याने त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांच्या ताब्यातून त्यांनी दिनांक 26/03/2023 रोजी सावनेर तसेच 01 वर्षा आधी चोरी केलेल्या 02 मोटरसायकल मिळुन आले.  02 मोटरसायकल व 04 आरोपी पोलीस स्टेशन सावनेर पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन सावनेर यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी नामे- 1) सुनील गोदरसिंग धुर्वे, वय 21 वर्ष 2) जितेंद्र पन्नालाल धुर्वे, वय 21 वर्ष 3) धर्मेंद्र पन्नालाल धुर्वे, वय 22 वर्ष 4) मंजेश मोहन कुंभडे, वय 25 वर्ष सर्व रा. मोहपाणी (गोधी) ता. बिचवा, जि. छिंदवाडा (म.प्र.) जप्त मुद्देमाल आरोपीकडुन 1) होंडा शाइन मोटरसायकल क्र. एम.एच-40/ए.यु-1825 2) सी.डी डीलक्स मोटर सायकल क्र. एम.एच-31/सी.ई-7530 वरीलप्रमाणे मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करून पोस्टे सावनेर येथे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याने पुढील कारवाई कामी पोस्टे सावनेर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार राजू रेवतकर, पोलीस नाईक किशोर वानखेडे, आशिष मुंगळे, उमेश फुलबेल यांचे पथकाने केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com