दोन वर्षांपासून कंत्राटदाराने अपूर्ण व अर्धवट सोडून दिलेला रस्ता मनपा हॉट मिक्स प्लान्ट तर्फे पूर्ण

नागपूर :- येथील चिंचभवनलगत प्रभाग क्र 35 मधील रहिवाशांना गत दोन वर्षांपासून अर्धवट रस्त्यामुळे होत असलेल्या त्रासातून आज मुक्तता करत मनपा हॉट मिक्स प्लान्टच्या वतीने अपूर्ण रस्त्याचे काम आज पूर्ण केले आहे .

धंतोली झोन क्र 4 अंतर्गत प्रभाग क्र 35 मधील 50 मीटर DP रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा यांचे मंजुरीने में. पी के construction यांना देण्यात आले होते, तथापि,निधी कमतरते मुळे कंत्राटदाराने हा रस्ता अर्धवट सोडून दिला होता, त्यामुळे वाहतूकीच्या दृष्टीने येथील रहिवाशांना गैरसोयीचे व अपघातजन्य स्थितीत मार्गक्रमण करावे लागले.

उपरोक्त डीपी रस्त्याचे अर्धवट सोडून दिलेले काम आज मनपाचे हॉट मिक्स प्लान्टतर्फे पूर्ण करण्यात आले असून Chinchbhavan Ghat -Balance DP road 2x 50 x 9 mtr = 900 Sq mtr असलेला हा मनपा हॉट मिक्स प्लान्ट चा 50 वा रस्ता करण्यात आला आहे असे प्लान्ट चे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान..

Fri Apr 19 , 2024
मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के आणि चंद्रपूर १८.९४’ टक्के आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com