सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक १९/०१/२०२४ रोजी १५.३० वा. ते १७.०० वाजता पर्यंत जवाहरलाल नेहरू विद्यालय सावनेर येथील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीचे नियम पाळण्याबावत मार्गदर्शन करून पोलीस स्टेशन गांधी चौक राजकमल चौक गडकरी चौक खापा टी पॉइंट जवाहरलाल नेहरू विद्यालय पर्यंत वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्याकरिता मिरवणूक काढण्यात आली होती. सदर वाहतूक नियम पाळण्यासाठी काढण्यात आलेली मिरवणूक अनिल मस्के भापोसे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनात रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर यांचे उपस्थितीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार, महामार्ग पोलीस अंमलदार, होमगार्ड व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
तसेच दिनांक २०/१/२०२४ रोजी सकाळी ९/०० वा. ते ११.४५ वाजता दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त पोलीस स्टेशन सावनेर व लायन्स क्लब सावनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी, बीपी, शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिविर मध्ये मान्यवरांनी वाहन चालकास रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करून जनजागृती केली. सदर कार्यक्रम अनिल मस्के भापोसे सहाय्यक पोलीस अभीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर, विलास डोईफोडे अध्यक्ष लायन क्लब व डॉ. पुण्याणी तसेच इतर डॉक्टर, पोलीस अधिकारी अंमलदार, होमगार्ड, खाजगी वाहन चालक उपस्थित होते, वाहन चालकाचे व पोलिस अंमलदाराची या शिबीर दरम्यान आरोग्य तपासणी करण्यात आली.