– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई
भिवापूर :- पोलीस भिवापूर येथील स्टाफ पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना बस स्टॉप भिवापुर येथे मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, निलज फाटा कडून भिवापुर कडे एक टिप्पर मध्ये अवैद्यरित्या विनापरवाना रेती (वाळू) मेवुन जात आहे. अशा बातमीवरुन तहसिल टी पाईन्ट भिवापुर जवळ हायवे रोडवर भिवापुर कडुन उमरेडकडे १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४०/सी. एम. १११२ संशयितरित्या येतांना दिसल्याने टिप्पर चालक आरोपी नामे १) नितीन ज्ञानेश्वर वाढई वय ३२ वर्ष रा. मांगली ता. उमरेड जि. नागपुर यास टिप्पर धांवण्याचा इशारा केला असता चालकाने टिप्पर रोडचे कडेला थांबवुन चालकास टिप्पर मध्ये काय लोड आहे, याबाबत विचारणा केली असता टिपर चालकाने रेती (वाळु) भरून असल्याबाबत सांगितल्याने टिप्परची तपासणी केली असता टिप्पर मध्ये अंदाजे ०६ ब्रास रेती अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल बुडवुन तसेच सार्वजनिक मालमतेचे नुकसान करुन व सरकारी खनिज रेती (वालु) ची चोरटी वाहतुक करतांना टिप्पर चालक हा आढळून आल्याने टिप्पर चालकास रेती बाबत परवाना (रॉयल्टी) विचारपुस केली असता परवाना नसल्याचे सांगितले. टिप्पर मालक नामे प्रतिक विध्वंस रा. नागपुर यांचे सांगणेवरुन सदर टिप्पर मध्ये रेती भरुन आणल्याबाबत सांगितल्याने आरोपीचे ताब्यातून १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. -४०/सी. एम. १११२ किंमती २०,००,०००/- रुपये व त्यामध्ये ०६ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रुपये ब्रास प्रमाणे एकुण ३००००/- रुपये असा एकुण २०,३०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी चालक यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी विरुद्ध पोस्टे भिवापूर येथे कलम ३७९, १०९ भादवी ४८(७), ४८(८) महा. जमिन महसुल अधिनियम १९६६ सहकलम ४, २१ खानी आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधि, १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक १९८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेब अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सदमेक, पोलीस हवालदार प्रफुल माहुरे, पोलीस अंमलदार वाघमारे, रवी वानखेडे, चालक अविनाश सोरते यांनी केली.