संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आत्मा व कृषि संजीवनी सप्ताह सन 2023-24 अंतर्गत कामठी तालुक्यातील बिना संगम गावातील ग्रामपंचायत कार्यालयात कृषि महिला शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला आत्मा चे प्रकल्प संचालक डाॅ. अर्चना कडू , ग्रा प सरपंच .नारायणजी भडंग ,सचिव खारकर ग, प्रगतशील व गटातील शेतकरी,शेतकरी मित्र, आत्मा एटीएम,बी.टी.एम उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये महिलांनी परसबागेत भाजीपाला लागवड करून विमुक्त अन्नाचे उत्पादन करून आहारात समावेश करावा,निंबोळी गोळा करून निंबोळी अर्क तयार करणे व फवारणे त्याचे फायदे,दशपर्णी अर्क फवारणी करून पर्यावरन संतुलित ठेवून चांगले प्रतिचे उत्पादन घेणे,बिज प्रक्रीया,बियाणे उगवण क्षमता तपासणी,सेंद्रिय शेती,सामुहिक शेती,कापूस पिकाचे लागवड तंत्रज्ञान व वाळलेल्या पराटी शेतात न जाळता प्रक्रिया करणे,दुधाचे उत्पादन कसे वाढवता येईल, सोयाबीनपासुन सोयामील्क बनवीने व त्याचे फायदे, बांधावर वृक्ष लागवड, सीताफळ लागवड व विक्री,शेतात शेनखताचा वापर,पक्षी थांबे उभारणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. व शेतक-यांच्या समस्येवर निराकरण करण्यात आले.