गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबत

गडचिरोली : महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 (1965 चा महा.40) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याच्या कलम-6 चे पोटकलम (1) मधील खंड (क) त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगर विकास विभाग क्रमांक एमयुएन 2022/प्र.क्र.637/नवि-18 दिनांक 23 डिसेंबर,2022 याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र,असाधारण,भाग एक-अ मध्य उपविभाग,दिनांक 23 डिसेंबर,2022 यामध्ये उद्घोषणा प्रसिध्द केली असून,महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहे.

उक्त अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली / उप विभागीय कार्यालय,देसाईगंज/ तहसिल कार्यालय,आरमोरी / नगर परिषद,आरमोरी च्या सूचना फलकावर/ वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेच्या मसूद्यावर कोणताही आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे त्यांचे लेखी स्वरुपात कारणासह आक्षेप/ हरकती/ सूचना मागविण्यात येत आहेत. उक्त कालावधीत मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल. तरी सर्व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी, गडचिरोली, संजय मीणा यांनी कळाविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कर्नाटकच्या मराठी विरोधी प्रवृत्तीच्या निषेधाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेला ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर

Tue Dec 27 , 2022
सीमाभागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची कर्नाटक सरकारने हमी द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. २७ : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव, आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!