संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अनेक औषधी गुणधर्म युक्त काळ्या जांभळाचे कामठी शहरातील बाजारपेठेत आगमन झाले आहे. जांभळाचे शौकीन कितीही पैसे देऊन ते कमी प्रमाणात का होईना विकत घेत आहेत .मधुमेह,पचनशक्ती,यकृत आणि हृदयरोग इत्यादिसह इतर आजारावर बहुगुणी जांभळं फायदेशीर मानले जाते.तव हंगामातील आरोग्यदायी फळ आहे.बहुगुणी फळ पारंपारिक औषधी वापरासाठी वापरले जाते.
जांभळाच्या चार ते पाच प्रजाती आहेत त्यांचे मूल्य त्यांच्या प्रकारानुसार आहे .जांभळामध्ये पोषक आणि अँटीऑक्सिराईट असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.यात लॉगलोपसेमिक इंडेक्स असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. किडणीमध्ये स्टोन आला असला तरी तो जांभळाचा वापर फायदेशीर ठरतो.जांभूळ सेवन केल्याने लहान आकाराचे किडनी स्टोन पितळतात .जांभूळ हिरड्या आणि दातांसाठी फायदेशीर आहे.जांभळाच्या पानामध्ये बॅकटोरियारोधी गुणधर्म असतात. हिरड्यामधून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो .यासाठी पाने सुकवून घ्या त्यांची पावडर बनवा व या पावडरने हिरड्यांची मसाज करावा ,हे हिरड्यामधून रक्तस्त्राव आणि संसर्ग रोखण्यास मदत करते.या सर्व गुणधर्म युक्त जांभूळ बाजारपेठेत आल्याने हे जांभूळ खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढलेला आहे.
-जांभळाची झाडे झाली दुर्मिळ
—जांभळाची झाडे गावात ,नद्यांच्या काठावर आढळुन येतात परंतु आज शेतकरी अधिक पीक घेण्याच्या लालसेने ही झाडे शेतातून नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.पारंपारिक पणे जांभळाची झाडे नद्यांच्या काठावर आढळून येतात पण ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जांभळाची झाडे आता दुर्मिळ झाली आहेत .कालांतराने बहुगुणी जांभूळ दिसेनासे होते की काय ?अशी शंका जांभूळ शौकिनात व्यक्त केली जात आहे.