अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

पो.स्टे. नरखेड :-  यातील फिर्यादी / पिडीता यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. नरखेड येथे अप. क्र. ६४/१६ कलम ३७६(२) (जे), ३४२, ५०६ भादवि सहकलम ४ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील विधीसंघर्ष बालक याने फिर्यादीला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून घरी बोलावून घरातील बेडरूममध्ये नेवुन दार बंद करून, अन्यायाने कैदेत ठेवुन फिर्यादीसोबत जबरी संभोग केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगीतले तर जिवाने मारण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक दिलीप मसराम पो.स्टे. नरखेड यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता डी. जे. ०१ आझमी सो. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक १४/०६/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश आझमी  नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ३७६ (२) भादवि व कलम ४ पोक्सो मध्ये १० वर्ष सश्रम कारावास व १०,०००/- दंड दंड न भरल्यास ४ महिने साधा कारावास तसेच कलम ३४२ भादवि मध्ये ३ महिने सश्रम कारावास व १०००/- रु. दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारच्या वतीने एसीपी  माधुरी मोटपरे  यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून पोहवा / १२०४ सुरेद्रसिंग ठाकुर पो स्टे नरखेड यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल..

Thu Jun 15 , 2023
 पो.स्टे. नरखेड :- अंतर्गत ०५ कि.मी. अंतरावरील बेलोना येथे दिनांक १२/०६/२०२३ चे रात्री ०.०० वा. ते दिनांक १३/०६/२०२३ मे ०३.०० वा. रात्री दरम्यान फिर्यादी नामे-  प्रतिभा योगेश मोरसे, वय ३५ वर्ष, रा. मौजा बेलोना, ता. नरखेड ही दिनांक १२/०६/२०२३ रोजी आपले परीवारासह जेवण करून रात्री १२/०० वा. दरम्यान सर्व जण झोपी गेले होते दि. १३/०६/२०२३ रोजी रात्री ०२/४५ ला फिर्यादीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com