नवीन कामठी परिसर आरोग्य केंद्र सुविधेविना – माजी नगरसेवक प्रतीक पडोळे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 तसेच येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर परिसर हा नवीन कामठी परिसर म्हणून ओळखला जातो .या परिसरात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, मोठमोठे प्रसिद्ध शिक्षण संस्था, महावितरण कार्यालय तसेच बिडी कामगारांची एक मोठी वस्ती म्हणून प्रसिद्ध पावलेली कुंभारे कॉलोनी अस्तित्वात आहे.या परिसराला लागूनच लुंबिनी नगर,छत्रपती नगर,भुराजी नगर ,आदी वस्त्या जोडलेल्या आहेत.एक मोठी लोकसंख्या असलेल्या या नवीन कामठी परिसरात विकासाचा सपाटा झाला असला तरी येथे अजूनपावेतो नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून एकही शासकीय दवाखाना उघडू न शकल्याची खंत व्यक्त करीत नवीन कामठी परिसर आरोग्य सुविधेविना असल्याचे मत माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले.

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या नव्हे तर जगाच्या कोण्या कोपऱ्यातून नागरिक येत असतात.या परिसरात नागरिकांची रेलचेल वाढली आहे.परिसरात रस्ते,नाली सह आदी मूलभूत सुविधांचा विकास झाला असला तरी नागरिकांच्या आरोग्यत्मक काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असलेले रुग्णालय सुविधा नसणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.प्रभाग क्र 16,शीट नं 11,सर्व्हे नं 34 व विकास आराखड्या नुसार आरक्षण क्र 57 हे रुग्णालयासाठी राखीव आहे .तेव्हा या विकास आराखड्यानुसार मंजूर जागेत स्थानिक नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन आरोग्य सुविधेची जाणीव ठेवून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उघडावे अशी मागणी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीज पडण्यापूर्वीच मोबाईल वर मिळणार अलर्ट

Wed Jul 12 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -‘दामिनी’ऍप वापरण्याचे आवाहन कामठी :- पावसाळा सुरू झाला असून पावसाळयात विजांचा कडकडाट होणे नैसर्गिकच आहे बहुतांशवेळी ह्या विजा कोसळत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो .विशेषतः शेतकरी,मेंढेपाळ यांना शेतात ,जंगलात उघड्यावर वीज वारा यांचा सामना करावा लागतो आणि वीज कोसळल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडतात हे टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या भूविज्ञाण मंत्रालयाने दामिनी ऐप तयार केले आहे.त्यामुळे मान्सून कालावधीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com