नागपूर :- सार्वजनिक उत्सव मंडळांनी येत्या गणेसोत्सव व त्यापाठोपाठ येणा-या नवरत्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात व घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उस्तवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणी साठी घरगुती वीज पुरवठ्याच्या वीजदरा दरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीज जोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, गरबा, भोजनदान व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी 24 तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक 1912, 18002123435, किंवा 18002333435 यावर संपर्क साधावा अथवा 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुरक्षा महत्वाची
v गणेशोत्सव, नवरत्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
v वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते.
v जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानीचा संभाव्य धोका अधिक आहे.
v वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी.
v तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर