विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वे गाडीतुन घेतली उडी 

 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी रेल्वे फाटक व उंटखाना मार्गादरम्यान विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या तरुणाने कायदेशीर रित्या पोलिसांच्या तावडीत जाण्याच्या भीतीने महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेगाडीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी साडे नऊ दरम्यान घडली.सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेत सदर जख्मि तरुणाला हात व पायाला किरकोळ जखम आहे. या तरुणाचे नाव मोहित सोनी वय 32 वर्षे असे रा रिवा असे आहे.या घटनेतुन जन्म मृत्यूची वेळ कुणीच ठरवू शकत नाही तर ज्याला देव तारी त्याला कोण मारी अशी प्रचिती दिसून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जख्मि तरुण हा आपल्या आई वडीलासह रिवा हुन नागपूर ला येण्यासाठी रिवा इतवारी रेल्वेगाडीने प्रवास करीत असता दरम्यान नागपूर कडे जात असलेली ही रेल्वेगाडी भंडारा रेल्वेस्टेशन वर बराच वेळ थांबली.दरम्यानगोंदियाहुन कोल्हापूर कडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस भंडारा रेल्वे स्टेशन वर थांबताच कंटाळलेल्या स्थितीत असलेल्या सदर तरुणाने आई वाडीलासह जलद गतीने पोहोच होणार या आशेतुन सदर महाराष्ट् एक्सप्रेस मध्ये चढून प्रवास सुरु केला.ही रेल्वे गाडी कामठी जवळ पोहोचत असतानाच कन्हान ओलांडल्या नंतर रेल्वेगाडीत असलेल्या टी सिने तिकीट तपासत असताना सदर तरुणाला तिकीट विचारले असता त्यानी खरी परिस्थिती सांगितली मात्र टी सी ने यावर कुठलीही दया यांचना न दाखवता विना तिकीट प्रवास करण्याच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकीवजा करीत असताना सदर तरुणाने पोलिसांच्या तावडीत जाण्याच्या भीती पोटी उंटखाना जवळ धावत्या महाराष्ट्र एक्सप्रेस मधून उडी घेतली. नशीब बलवत्तर म्हणून बचावला.सदर तरुनाला उपचारार्थ नागपूरच्या मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले असून पुढोल तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Tue Nov 21 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवार आणि सोमवार (ता.१९ व २०) ०८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पंजाब डिझेल,वाडी,नागपूर यांच्यावर रस्त्यालगत वर्कशॉपचे साहित्य पसरविल्या प्रकरणी कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे.लाझीझ चीकन सेंटर,रामनगर चौक,नागपूर यांच्यावर चेंबर बाधित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com