– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कामगिरी
नागपूर :- दि. १७/०१/२०२४ चे १७.३० वा. दरम्यान विशेष पोलीस पथक नागपुर ग्रामीण हे अवैध्य धंदयावर रेड करणे करीता पोस्टे कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन गोपनीय माहिती मिळाली की, मौजा नाग नदी दातपाडी शिवारात असलेल्या नाल्यालगत विजय मांढरे, रा. कुही हा मोहाफुल सडव्याची साठवणुक करून मोहाफूल दारू काढतो अशा मिळालेल्या माहितीवरून मिळालेल्या माहितीची शाहानीशा करून मौजा नाग नदी दातपाडी शिवारातील पानंद नाला येथे रेड केली असता नाल्यालगत झाडा झुडपामध्ये मोहाफुल गावठी दारू गाळणान्या इसमावर कार्यवाही करण्यात आली.
अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारा आरोपी नामे विजय हरीभाउ मांढरे, वय ५५ वर्ष, रा. कुही ता. जि. नागपूर हा मोहाफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आला. आरोपींचे ताब्यातून प्रत्येकी २०० लीटर प्रमाणे अंदाजे ८०० लीटर मोहाफूल रसायन सड़वा भरलेले प्रति लीटर २०/-रू. प्रमाणे किंमती १६,०००/- रू., इतर साहित्य किंमती ५६८०/- रू. असा एकुण २१,६८०/- रूपयाचा मुददेमाल मिळून आल्याने नष्ट करण्यात आला. आरोपी विरुद्ध पो.स्टे कुही येथे कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके, पोलीस हवालदार हरीदास चाचरकर, ओमप्रकाश रेहपाडे, पोलीस अंमलदार अनिल करडखेले, अतुल वाते व गोरख निंबार्ते यांनी पार पाडली.