राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध संचालक डॉ. तेजस गर्गे यांची माहिती

मुंबई :- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहिरात करण्याअगोदर त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम अथवा चित्रीकरण करण्याकरिता संचालनालयाची विहीत पद्धतीने लेखी परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे, अशी माहिती पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

एका कंपनीने विनापरवानगी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या राज्य संरक्षित स्मारकावर त्यांच्या कंपनीच्या शीतपेयाची प्रतिकृती झळकत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठीच्या चित्रीकरणाकरिता अथवा कार्यक्रमाकरिता संचालनालयामार्फत त्यांना कोणतीही परवानगी निर्गमित केलेली नाही. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिरातीकरिता राज्य संरक्षित स्मारकांचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे तत्काळ ही जाहिरात हटवण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. गर्गे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम समाजमाध्यमावरील जाहिरात संकेतस्थळावरून काढण्यात यावी. विनापरवानगी अनधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयांचा जाहिरातीसाठी अनधिकृतपणे वापर करण्यात येणार नाही, असे प्रसिद्ध करण्यात यावे आणि तसे संचालनालयास लेखी कळविण्यात यावे, असे कंपनीला दिलेल्या पत्रात कळविण्यात आल्याचे त्यांनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या अनुषंगाने योग्य दखल घेतली गेली नाही तर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक - अलियाक्सांद्र मात्सुकोऊ

Wed Mar 20 , 2024
मुंबई :- बेलारूस भारतासोबत व्यापार, व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे. या दृष्टीने बेलारुसमधील ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्राशी ‘भगिनी राज्य’ सहकार्य करार करण्यास प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबईतील बेलारुसचे नवनियुक्त वाणिज्यदूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ यांनी आज येथे दिली. बेलारुसने मुंबई येथे प्रथमच आपला स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु केला असून पहिले वाणिज्यदूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ यांनी मंगळवारी (दि. १९) राज्यपाल रमेश बैस यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com