विद्यापीठाचे समाजोपयोगी संशोधनास प्रोत्साहन – प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे

विद्यापीठात संशोधनासाठी शिक्षकांना संशोधन निधीचे वितरण

अमरावती :-   राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान परिषद, मुंबई यांचेकडून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक शिक्षकांना समाजोपयोगी संशोधनासाठी अनुदान प्राप्त झाले असून त्या अनुदानाच्या धनादेशचे आज विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे शुभहस्ते वितरण करण्यात आले. शिक्षकांनी समाजोपयोगी संशोधनाला प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान परिषद, अमरावती विद्यापीठ समन्वयक डॉ. अनिता पाटील, उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील उपस्थित होत्या.

प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे हस्ते 13 संशोधक शिक्षकांना संशोधनासाठी धनादेश वितरीत करण्यात आला. पुढे बोलतांना ते म्हणाले, दर्जेदार संशोधन करण्याची संधी या निमित्ताने शिक्षकांना प्राप्त झाली आहे. विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक संशोधन करीत असून त्यांना मिळत असलेल्या वित्तीय सहाय्यामुळे अधिक शिक्षक संशोधनासाठी पुढे येतील. याशिवाय ज्यांना संशोधनासाठी अनुदान प्राप्त झाले आहे, ते आपल्या संशोधनाचे कार्य विहित वेळेत पूर्ण करतील, असे सांगून त्यांनी सर्वांचे याप्रसंगी अभिनंदन केले.

कुलसचिव डॉ. तुषार देशमुख मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान परिषद, मुंबई यांचेकडून 50 लक्ष रुपयांचा निधी संशोधनासाठी प्राप्त झाला आहे. उत्कृष्ठ संशोधनाचे प्रोजेक्ट त्यांचेकडून मंजूर झाले असून त्या शिक्षकांना आज संशोधनासाठी अनुदान वितरीत होत आहे. त्या संस्थांच्या गाईडलाईन्सची काटेकोरपणे अंमलबजावणी सर्वजण करतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. समन्वयक डॉ. अनिता पाटील यांनी सांगितले, याकरीता 27 प्रस्ताव प्राप्त झाले होते, त्यामधून ऑनलाईन प्रेझेन्टेशन घेण्यात आले. विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयातील 13 संशोधकांचे संशोधन प्रस्ताव मंजूर झाले. याकरीता 24 महिन्यांचा कालावधी असून मार्च 2024 पर्यंत संशोधन कार्य पूर्ण करावयाचे आहे.

संशोधनासाठी निधी प्राप्त झालेल्यांमध्ये संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निलेश खंडारे (95,000/-), अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचे डॉ. अजय लाड (5,00,000/-), जवाहरलाल दर्डा इन्स्टिट¬ुट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यवतमाळचे डॉ. संदीप सोनी (1,90,000/-), विनायक विद्या महाविद्यालय, नांदगाव खंडेरचे डॉ. प्रशांत खरात (2,25,000/-), श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंंजनगाव सुर्जीचे डॉ. सतिश मार्डीकर (3,80,000/-), जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरचे डॉ. संतोष उके (5,00,000/-), डी.सी.पी.ई., अमरावतीचे डॉ. सिध्दार्थ गणवीर (1,20,000/-), आदर्श विज्ञान, जे.बी.आर्टस् व बिर्ला वाणिज्य महाविद्यालय, धामणगाव रेल्वेच्या डॉ. माया मावळे (1,15,000/-), श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजाचे डॉ. पांडुरंग पवार (4,70,000/-), श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगावचे डॉ. एस.पी. त्रिकाल (1,18,700/-), श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथील डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे नितीन बोरकर ( 2,00,000/-), जगदंबा महाविद्यालय, अचलपूरच्या डॉ. प्रिती टवलारे (2,50,000/-) व सिपना अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. एस .व्ही, रोडे (3,50,000/-) यांना मंजूर रकमेपैकी संशोधनासाठी पहिल्या हप्त्याचा धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला.

संचालन व आभार उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची आधार नोंदणी प्राधान्याने करा जिल्हाधिका-यांचे आधार सनियंत्रण आढावा बैठकीत निर्देश

Thu Nov 17 , 2022
नागपूर :- जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांची आधार नोंदणी प्राधान्याने करा. जन्मतःच बालकांची आधार नोंदणी होण्यासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने पोस्ट विभागात असलेल्या आधार केंद्राच्या सहकार्याने आधार नोंदणी प्राधान्याने करावी, असे निर्देश संबंधित विभागांना जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर यांनी दिले. नि. लेफ्टनंट कर्नल अक्षय यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com