– अमरदिप बडगे, प्रतिनिधी
– अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी 2 आरोपींना जेरबंद
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे बगळण्याविरुध मोहीम सुरू असताना एक पथक तयार करण्यात आले. असुन पथकाने दवणीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलागोंडी येथे खेमलाल बुधुलाल मस्करे यांच्या घरी झळती घेतली असता त्यांच्या कडून 13 लोखंडी तलवार आढळून आलेले आहे. तलवारी कुठून आणल्या या बाबद् चौकशी केली असता तलवारी आरोपीचा भाचा विधिसंघर्ष बालकांनी आणल्याचे कबूल केले.
त्या नंतर पोलिसांनी विधिसंघर्ष बालकांनी याला विचारपूस केली असता विधिसंघर्ष तलवारी आणल्याचे कबूल केले . आरोपींकडे आढळलेल्या अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी पोलीस स्टेशन दवानिवडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तलवारी आणल्या कुठून आणि कोणत्या उदेशाने आणले याची चौकशी पोलिस करत आहे.