– कुटुंबात शोक,तणावातून शक्यता
वाडी :- वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत पॉप्युलर सोसायटी नाका नंबर १० येथील निवासी प्रियंका चंद्रशेखर बांगरे वय-२२ वर्ष या युवतीने स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार प्रियंका चे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले असल्याने कुटुंबीयांनी तिच्या लग्नाची तयारी सुरु केली होती. त्या अंतर्गत नुकतेच एक महिना अगोदर ३० एप्रिल ला नागपूर निवासी एका युवकासोबत तिचे साक्षगंध देखील झाले होते. तिच्या परिवारात आई मजुरीचे काम करीत असून वडील मानसिक रुग्ण आहेत व भाऊ खाजगी कंपनीत काम करायचा.
घटनेच्या आदल्या दिवशी ती आपल्या होणाऱ्या पतीला भेटून ही आली असल्याचे समजते.काल मंगळवारी सकाळी जेंव्हा तिची आई व बाबा बाहेर गेले तेव्हा प्रियंका ने दार बंद करून घेतले व घरी असलेले रॉकेल आपल्या अंगावर ओतून स्वतः ला पेटवून घेतले. आग सहन न झाल्याने ती ओरडली आवाज व धूर घराबाहेर आल्याने आजूबाजूचे नागरिक एकत्रित आले.यावेळी प्रियंका जळालेल्या अवस्थेत दिसून आली व बाजूला रॉकेलची कॅन पडल्याचे आढळून आले.घटनेची माहिती वाडी पोलिसांना देण्यात आली असता वाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शवाला उत्तरीय तपासणी करिता नागपूर स्थित मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रियंका मागील काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याचे समजते.पारिवारिक कलहा मुळे ही आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे पुढील तपास वाडी पोलीस स्टेशन करीत आहे. मृत्यूचे खरे कारण अद्याप करू शकले नाही.