भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या विविध योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन बळकट करावे- चित्रा वाघ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान भारतीय जनता पार्टी महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी तालुक्यातील खरबी येथील चामट सभागृहात आयोजित महिला भाजप महिला मोर्चा कार्यकर्त्याच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

महिला मेळाव्याचे उद्घाटन भाजप भारतीय जनता पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे हस्ते दीप प्रजलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी नागपूर जिल्हा अध्यक्ष संध्या गोतमारे, प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार ,भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये ,संघटन मंत्री किशोर रेवतकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर ,नागपूर जिल्हा भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी लता गावंडे, प्रसिद्धीप्रमुख सुधा सेलोकर माया पाटील, शुभांगी गायधने, राजूताई भोले, प्रतिभा गवळी ,कामठी तालुका भाजप अध्यक्ष मंगला कारेर्मोरे, मौदा तालुका अध्यक्ष नीलिमा घाटोळे नागपूर ग्रामीण अध्यक्ष पूजा धांडे ,लतेस्वरी काळे, उपस्थित होते.

महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना चित्रा वाघ म्हणाल्या केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारच्या विविध महत्वकांसी योजना शेतकरी ,दिनदूबल्या ,समाजातील विविध घटक व शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक भाजप मोर्चा महिला कार्यकर्त्यांनी पोहोचवून ,समजावून शासनाच्या विविध योजनांच्या मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे घेण्याविषयी मार्गदर्शन करून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. सोबतच आगामी होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुथ संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी कार्य करण्याचे आवाहन केले संचालन शुभांगी गायधने यांनी केले व आभार प्रदर्शन मंगला कारेर्मोरे यांनी केले मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com