खैरी गावात कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी तालुका विधी सेवा प्राधिकरण चा उपक्रम

कामठी :- समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टिकोनातून कामठी तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती द्वारे खैरी गावात 9 नोव्हेंबर ला कायदाविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ श्रेणी जे.ए.कोटणीस व कामठी न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधिश .ए.ए.कुलकर्णी तर प्रामुख्याने ,ग्राम पंचायतचे सरपंच बंडु कापसे ,कामठी न्यायालयाचे वकील अॅड.विलास जांगडे, अॅड.प्रफुल पुडके, अॅड.रिना गणवीर व अॅड.आर.डी.भिमटे अॅड.संदीप अढाऊ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात दिवाणी न्यायाधिश .ए.जे.कोटणीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विधी सेवा प्राधिकरण/समिती द्वारे होणाऱ्या कार्याची माहिती व मोफत विधी सेवा प्राप्त करण्याबद्दलची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच सरपंच बंडू कापसे यांनी देखील ग्रामस्थांना विधी सेवा प्राधिकरण द्वारे होत असलेल्या कार्याचे व मोफत विधी सेवा घेण्याबद्दल विनंती केली व मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा सूत्र संचालन अॅड.संदीप अढाऊ यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

असंगठित कामगार कांग्रेस की बैठक उत्साह पूर्वक संपन्न

Sat Nov 12 , 2022
नागपूर :-भारत जोड़ो यात्रा में सहभागिता के लिए असंगठित कामगार एवं कर्मचारी कांग्रेस की बैठक देवडीया कांग्रेस भवन में आयोजित की गई थी । इसे संबोधित करने के लिए दिल्ली से राष्ट्रिय अध्यक्ष उदितराज, राष्ट्रीय कॉर्डिनेटर सुनील शिंदे, प्रदेश अध्यक्ष बदरूज्जमां, राजखत्री व विदर्भ के सभी जिला प्रमुख उपस्थित थे । शहर कांग्रेस अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे के निर्देशानुसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com